in ,

औरंगाबादेत कोरोनाचे शतक! दिवसभरात २३ नवीन कोरोनाग्रस्त

Share

औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोना संकटाचं प्रमाण वाढतच आहे, तब्बल २४ तासांत ५२ कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण वाढल्याने औरंगाबादेत चिंता ही वाढली आहे. औरंगाबादेत आज २३ नवीन रुग्ण आढळले आहेत. दुपारी आणखी १० जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोना रुग्णांचा आकडा १०५ वर पोहचला आहे. अशी माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

कोरोना बाधितांमध्ये संजयनगर, मुकुंदवाडी येथील २, किलेअर्क येथील १, पैठणगेट येथील ४, भीमनगर येथील १, बडा तकिया मशीद सिल्लेखाना येथील १ आणि दौलताबाद येथील १ अशा नव्या दहा रुग्णांचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये समावेश आहे. सद्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७६ आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात आतापर्यंत २३ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हा आकडा पाहता औरंगाबाद मध्ये कोरोणाची भीती आणि दहशतह अधिक वाढली आहे.

औरंगाबादमध्ये आज एकूण २३ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात ६ जण हे १६ वर्षाखाली असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व रुग्णांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. औरंगाबादेमध्ये काल (२७ एप्रिल) २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज २३ जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

शहरात १५ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. परदेशातून आलेल्या एका महिलेला संसर्ग झाला. त्यानंतर तब्बल १५ दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला; पण दोन एप्रिलला एन- चारमधील एका महिलेला बाधा झाली आणि त्यानंतर आजपर्यंत तब्बल १०५ व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्या. १५ मार्च ते २६ एप्रिल या दरम्यान रुग्णसंख्या पन्नासच्या वर गेली होती. मात्र दोनच दिवसांत आता रुग्णसंख्या ५२ वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादकरांसाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठवाड्यातील ८ पैकी ३ जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. औरंगाबाद वगळता इतर ४ जिल्ह्यांमध्येही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील किमान ७ जिल्हे लवकरचं कोरोनावर मात करण्याची शक्यता आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

दररोज चार हजार गरिबांची भूक शमवण्याची जिद्द…

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारची मुंबई पोलिसांना २ कोटी रुपयांची मदत