in

Corona Virus | कोरोनामुळे जग 25 वर्षं मागे गेलं ; बिल गेट्स फाउंडेशनचा अहवाल

Share

कोरोना महामारीच्या या संकटांच्या दिवसांवर बिल गेट्स यांच्या फाउंडेशनने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आलीय. कोरोनाच्या महामारीमुळे जग सुमारे 25 वर्षं मागे गेलंय, असं एका अहवालात समोर आलं आहे. बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने त्यांचा गोलकीपर्स रिपोर्ट प्रकाशित केला आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाचं ध्य़ेय साध्य करण्याच्या प्रगतीला खीळ बसली आहे, अशी आकडेवारी यात देण्यात आलीय.

कोव्हिड- 19 मुळे देशात गरिबीचं प्रमाण वाढलं आहे. 1990 मध्ये आरोग्ययंत्रणांच्या कार्यपद्धतीचं जे स्वरूप होतं तसंच सध्याच्या काळात आहे. म्हणजेच गेल्या 25 आठवड्यात जग 25 वर्षं मागे गेलं आहे. या संकटावर उपाय म्हणून आरोग्यनिदान, लसनिर्मिती आणि उपचार याला प्राधान्य द्यावं लागेल, असंही या अहवालात म्हटलं आहे. इबोलाच्या साथीनंतर पुन्हा एकदा अशी भयंकर महामारी येईल आणि जगाला त्याला तोंड द्यावं लागेल, असा इशारा बिल गेट्स यांनी काही वर्षांपूर्वीच दिला होता. त्यांनी वर्तवलेली ही स्थिती खरी ठरली.

पण त्याचबरोबर कोव्हिड-19 च्या साथीला सामोरं जाताना आपल्याला माणुसकीची एक बाजू दिसून आली. चाकोरीबाहेरच्या उपाययोजना, प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनी केलेली कामगिरी आणि आपले कुटुंबिय, शेजारी आणि समाजाला मदत करणारे अनेक जण दिसून आले, असंही बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी लिहिलं आहे. ही जगभरात उद्भवलेली समस्या आहे आणि या समस्येला जगाने एकत्रितपणे सामोरे गेले पाहिजे, असंही त्यांनी या अहवालात म्हटलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

डॉ.आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी कार्यक्रम रद्द

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी बंदी