लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात कोरोनाचा कहर कायम असून गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर आता 42 व्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्र देशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरलं आहे. 3 हजार 365 नव्या कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येसह राज्यानं केरळला मागे सोडलं आहे.
तसेच कोरोनाची रुग्णसंख्या सलग वाढत राहिल्यास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कठोर पाऊलं उचलावी लागतील. सोमवारी राज्यात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 67 हजार 643 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत तब्बल 51 हजार 552 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यात रोज 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेनं धारावीतील काही क्षेत्रात मोबाईल टेस्टिंग व्हॅन तैनात केली आहे. धारावी, दादर आणि माहीम परिसरात आठवडाभरात कोरोना रुगणांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली असल्यानं पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. नुकतंच राज्य सरकारनं केरळवरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक आहे.
Comments
Loading…