in

Corona Virus | ग्रामीण भागात 69.4% लोकांना कोरोनाची बाधा

Share

कोरोनावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली असून, एका दिवसात विक्रमी २९ मृत्यू, तर १,४६५ नवे रुग्ण गुरुवारी आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद गुरुवारी नोंदली गेल्याने धास्ती वाढली आहे. यात नाशिक शहरात सर्वाधिक १९, ग्रामीणमध्ये आठ, तर मालेगावमधील दोन जणांचा समावेश आहे. याबाबत इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) देशात अलीकडेच सेरो सर्वेक्षण केले. यामध्ये ग्रामीण भागात 69 .4 % लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

नाशिक शहर आणि मालेगाव वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. सिन्नर, निफाड, नांदगाव, इगतपुरीसह उर्वरित तालुक्यांमध्ये करोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागात एक सप्टेंबर रोजी एकूण रुग्णसंख्या ९,२७९ होती. आता ती १२ हजार ९७ पर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागातील मृत्युसंख्याही ग्रामीण भागाने आघाडी घेण्यास सुरूवात केली असून, मागील दहा दिवसात ५२ जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहे.

 तर गेल्या 24 तासात देशात तब्बल 96 हजार 551 नवीन रुग्णांची नोंद झाली असल्याने रुग्णसंख्या 45 लाख 62 हजार 414 झाली आहे. काल दिवसभरात 1 हजार 209 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 9 लाख 43 हजार 480 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 35 लाख 42 हजार 663 लोकं निरोगीही झाले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

रिया चक्रवर्तीचा मुक्काम जेलमध्येच

मुंबईसह राज्यात जोरदार पावसाचा इशारा ; 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट