राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. आज तब्बल 55 हजार 469 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य शासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढत चालली आहे.
आजच्या आकडेवारीनुसार राज्यात 4 लाख 72 हजार 283 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.त्यासोबतच आज दिवसभरात 55 हजार 469 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 31 लाख 13 हजार 354वर गेला आहे. आज तब्बल 297 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 56 हजार 330 एवढा झाला आहे. राज्य सरकारकडून नुकतेच संपूर्ण लॉकडाऊन न करता नवे निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
मुंबईत 10 हजार तर पुण्यात 6 हजार नवे कोरोना रुग्ण
मुंबईत गेल्या २४ तासांत मुंबईत एकूण 10 हजार 30 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 31रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना मृतांची संख्या 11 हजार 828 इतकी झाली आहे. त्यासोबतच, कोरोनाबाधितांची संख्या देखील 4 लाख 72 हजार 332 इतकी झाली आहे.
पुणे शहरात दिवसभरात 5 हजार 600 कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 2 लाख 99 हजार 721 इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान 38 रुग्णांचा मृत्यू झाला असून 5 हजार 526 मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान 3 हजार 481 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर 2 लाख 49 हजार 373 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Comments
Loading…