in ,

कोरोना व्हायरस: राज्यात दिवसभरात १९ जणांचा मृत्यू, एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ६८ वर

Chennai: Security personnel wearing mask as preventive measure against the novel coronavirus, at Rajiv Gandhi Government General Hospital in Chennai, Sunday, March 8, 2020. (PTI Photo)(PTI08-03-2020_000147B)
Share

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८ हजार ६८ वर पोहचली आहे. प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून राज्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे ४४० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असले तरी मुंबई चिंतेची कारण बनत चालली आहे. हा राज्यासाठी उच्चांक ठरत असून कोरोनाची भीती अजून वाढली आहे. त्याचवेळी दिवसभरात कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू झाला असून या कोरोनामुळे आतापर्यंत ३४२ जणांचा बळी गेला आहे.

त्यातला त्यात दिलासादायक बातमी म्हणजे ३१ पत्रकारांनी कोरोनावर यशस्वी पणे मात केली आहे. त्यामुळे आज बरे झालेल्या आणि डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ११२ आहे तर आत्तापर्यंत ११८८ रुग्णांना कोरोना मुक्त करत घरी सोडण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, कोरोनाचं संकट दिवसागणिक अधिकच मोठं होत चाललं आहे. त्यात मुंबईत कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव वाढतच आहे. एकट्या मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४०७ झाली आहे तर मुंबईतील मृत रुग्णांचा आकडा आता २०४ वर पोहोचला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

३१ पत्रकारांची कोरोनावर मात; पत्रकारांचे चाचणी अहवाल दुसऱ्यांदा निगेटिव्ह

यवतमाळमध्ये कोरोनाने अर्धशतक पार; आज १६ नवे रुग्ण आढळले