in

corona vaccine : PM मोदींच्या आई हिरा बेन यांनी घेतली कोरोना लस

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिरा बेन यांनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली. यापूर्वी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनीही कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. याशिवाय इतरही अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे.

‘मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे, की माझ्या आईने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. मी सर्वांना आवाहन करतो, की तुम्ही पुढे अधिकाधिक लोकांना कोरोना लस घेण्यासाठी प्रेरित करावे.’ असे कॅप्शन देऊन पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन या गुजरातच्या गांधीनगरमध्ये राहतात. हिराबेन या सध्या १०० वर्षांच्या आहेत.

देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे लसीकरणाचा वेगही वाढवला आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील लोक तसेच इतर आजारांनी ग्रस्त असलेले 45 ते 59 वर्ष वयोगटातील लोकांना लस देण्यात येत आहे. आता सरकार यात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांचाही समावेश करणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘हा MPSC परीक्षार्थीवर अन्याय’;पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला घरचा आहेर

हरिद्वार येथील कुंभमेळ्यामध्ये २२ लाख लोकांचे पहिलं शाही स्नान संपन्न