in

Corona Vaccine | जानेवारी 2021 अनेक लसी येणार

Share

जानेवारी 2021 मध्ये कोरोनाला हरवणारी एक नाही, तर अनेक लसी हिंदुस्थानात येतील अशी दिलासादायक बातमी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. जुलै 2021 पर्यंत देशात 40 ते 50 कोटी डोस पोहोचतील, असेही ते म्हणाले.

कोरोना महामारीचे संकट अद्याप कमी झालेले नाही. देशाच्या विविध भागांमध्ये रुग्ण आढळून येत असून कोरोनावरील लस कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच एकापेक्षा जास्त कंपन्यांकडून लस पुरवली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना लसीच्या वितरण व्यवस्थेबद्दल केंद्र सरकार राज्याकडून माहिती घेत आहे. सर्वांना ही लस कशी उपलब्ध होईल या दृष्टीने नियोजन करून देशातील प्रत्येकापर्यंत लस पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आणि प्राथमिकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

हैदराबादमध्ये पावसाचं तांडव ; १४ जणांचा मृत्यू

Rain Update | 5 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट