in

Corona Vaccine | कोरोना लससाठी डिजिटल हेल्थ आयडी कार्ड महत्वाचे ; PM नरेंद्र मोदी

Share

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा धडकी भरवणारा आकडा समोर येत असताना आता कोरोनाच्या लसीकरणाबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. PM नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की, देशातील प्रत्येक नागरिकाला राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाअंतर्गत हेल्थ कार्ड दिले जाईल. आता २ महिन्यांनी PM मोदींनी पुन्हा ‘लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल हेल्थ आयडी वापरला जाईल’ असे संकेत दिले आहेत.

PM मोदी म्हणाले की, ”डिजिटल हेल्थ कार्डसह डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यासाठी एका वितरण प्रणालीवर काम केले जात आहे. याद्वारे नागरिकांचे लसीकरण केले जाईल. भारतातील लोकांनी विविधतेने नेहमीच सर्वांना आकर्षित केले आहे. आपला देश अमेरिकेच्या लोकसंख्येच्या चौपट आहे. आपली बरीच राज्ये युरोपियन देशांइतकीच आहेत. भारतात कोरोनाचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे.

१५ ऑगस्टच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेल्थ कार्डबाबत माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की, ”प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ कार्ड दिले जाईल. हे कार्ड प्रत्येक भारतीयांच्या आरोग्य खात्याप्रमाणे काम करेल. या कार्डमध्ये तुमची प्रत्येक चाचणी, आजार, कोणत्या डॉक्टरकडून कोणतं औषध घेतले आहे, त्याचे उपचार केव्हा घेतले, त्याचे रिपोर्ट काय आले ही सर्व बाबींचा समावेश असेल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष

पी.व्ही. सिंधू लंडनला रवाना ; ट्वीट करून दिलं कारण