in

Corona Vaccine | लस उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटींची गरज : अदर पूनावाला

सध्या कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली असून व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यास अनेकांकडून विचारणा केली जात आहे. अशा परिस्थिती मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध असणं महत्त्वाचं आहे. दरम्यान Covishield लसीचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टीट्यूटला आपल्या लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी ३ हजार कोटी रूपयांची गरज आहे. सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.

यापूर्वी अदर पूनावाला यांनी परवडणाऱ्या दरात सुरूवातील १०० दशलक्ष डोस देण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. “कंपनीला आताच्या तुलनेत मोठा नफा कमवायला हवा होता. जेणेकरून ती रक्कम उत्पादन आणि सुविधांसाठी पुन्हा गुंतवता आली असती. तसंच अधिक डोसही उपलब्ध करता आले असते,” असं अदर पूनावाला म्हणाले.

“आम्ही भारतीय बाजारात लस जवळपास १५० ते १६० रूपयांमध्ये सप्लाय करत आहोत. जेव्हा ही लस तयार करण्याचा खर्च हा जवळपास २० डॉलर्स (अंदाजे १५०० रूपये) आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या म्हणण्यावरून कमी दरात ही लस उपलब्ध करून देत आहोत. असं नाहीये की आम्ही नफा कमवत नाही. परंतु आम्हाला अधिक नफा होत नाही जो पुन्हा गुंतवणूक करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे,” असं पूनावाला यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमेरिकेत 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लस

Corona Update | रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक