in

Corona update | भारतीयांना दिलासा.. कोरोना रुग्ण संख्येत घट

देशात एप्रिल-मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. परंतु आता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय. त्यामुळे भारतीयांना दिलासा मिळाला आहे. देशात मे महिनाच्या अखेरच्या दिवशी (31 मे 2021) १ लाख २७ हजार ५१० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर गेल्या २४ तासांत करोनामुळे २७९५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका दिवसात २ लाख ३१ हजार २८७ रुग्णांना रुग्णालयातून करोनामुक्त होऊन घरी परतले, अशी माहिती मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रलायाकडून देण्यात आली.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ८१ लाख ७५ हजार ०४४ वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ रुग्ण करोनावर मात केलीय. तर सध्या १८ लाख ९५ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ८९५ वर पोहचलीय.
देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २१ कोटी ६० लाख ४६ हजार ६३८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २७ लाख ८० हजार ०५८ लसीचे डोस सोमवारी देण्यात आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालघरमध्ये नवजात बालकाला कोरोनाची लागण

पदोन्नतीतील आरक्षण | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक सुरू