in ,

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, कोरोना रुग्णसंख्येचा आलेख घसरला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मे महिन्यात घसरणीला लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने सापडणाऱ्या करोनाबाधितांची संख्या ३० हजारांच्या खालीच होती, आता वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात २० हजार ७४० नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.

राज्यात सध्या २ लाख ८९ हजार ८८ सक्रीय रुग्ण आहेत. दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट ९३.२४ टक्के इतका झाला आहे. राज्यात मृतांचा आकडाही ५०० च्या खाली आला आहे. दिवसभरात राज्यात ४२४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा ९३ हजार १९८ इतका झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लक्षद्वीप बेटावर नक्की काय गोंधळ सुरू आहे ? जाणून घ्या कोण आहेत प्रफुल खोटा पटेल

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारतीचा स्लॅब कोसळला, 5 जणांना काढलं बाहेर