कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस गडद होताना आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,09,50,201 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात तब्बल 1,56,014 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा देशात धोका वाढला असून लोकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच पाश्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
नव्या गाईडलाईन्सनुसार, प्रवासापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरशन फॉर्म जमा करावा लागणार आहे. कोरोनाचा निगेटीव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्टही अपलोड करावा लागणार असून हा रिपोर्ट 72 तासांपेक्षा जुना नसावा. गाईडलाईन्सनुसार, सर्व प्रवाशांना RT-PCR टेस्ट रिपोर्टच्या ऑथेन्टिसिटीचं डिक्लेरेशन देणेही गरजेचं असेल. जर हे खोटं आढळून आलं तर दंडात्मक कारवाई होईल.नवीन गाई़डलाईन्स 22 फेब्रुवारीच्या रात्री 11.59 वाजेपासून लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. जे प्रवासी कुटुंबातील कुठल्या सदस्याच्या मृत्यू झाल्याने भारतात येत आहेत. अशा लोकांना कोणत्याही नकारात्मक आरटी-पीसीआर रिपोर्टची गरज नसणार आहे. अशी माहिती देखील आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहेत.
Comments
Loading…