in

Corona Update | २४ तासांत पुन्हा ३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, तर १,३२,७८८ नव्या रुग्णांची वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १ लाख ३२ हजार ७८८ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ हजार २०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २ लाख ३१ हजार ४५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी ८३ लाख ७ हजार ८३२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ३५ हजार १०२ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ६१ लाख ७९ हजार ८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या देशभरात १७ लाख ९३ हजार ६४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २१ कोटी ८५ लाख ४६ हजार ६६७ जणांचो कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR)ने दिलेल्या माहितीनुसार, देशात १ जूनर्यंत ३५ कोटी ५७ हजार ३३० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात २० लाख १९ हजार ७७३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वॉक इन लसीकरण सुविधा

“फडणवीस एक दिवस ‘मातोश्री’वरही येतील”