राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान याआधी सुद्धा दोन वेळा त्याला कोरोनाची लागण झाली होती. खडसेंसोबत सूनबाईक खासदार रक्षा खडसे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.
खडसे यांनी ट्वीटमध्ये म्हटले, “माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे, काळजीचे कारण नाही. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो”, असेही ते म्हणाले.
याआधी दोनदा कोरोना पॉझिटिव्ह
एकनाथ खडसे यांना सर्वात आधी 19 नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवसांच्या उपचारानंतर ते बरे झाले होते. जवळपास महिन्याभरानंतर 31 डिसेंबर रोजी पुन्हा त्यांच्यामध्ये कोरोना सदृश्य लक्षणे आढळली होती. या दरम्यान त्यांना ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलवले होते. मात्र, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांनी ईडीकडून तारीख वाढवण्याची मागणी केली होती. ती मागणी ईडीने मान्यही केली होती.
जंयत पाटील यांना कोरोनाची लागण
महाविकास आघाडीचे जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो असे स्वत जंयत पाटील यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे” अशा आशयाचे ट्विट जंयत पाटील यांनी केले आहे.
Comments
Loading…