in ,

”कोरोना हवेतून पसरतो”; लॅन्सेटच्या अहवालाने खळबळ

देशासह राज्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वोत्तपरी प्रयत्न करीत असताना आता लॅन्सेटने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात कोरोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेवर भविष्यात आणखी ताण येण्याची शक्यता आहे.

रोना विषाणू हवेतून पसरत असल्याचा पुरावा असल्याचा दावा या समितीने केला आहे. सहा तज्ज्ञांच्या समितीने सखोल अभ्यास करून अहवालात ही बाब नमूद केली आहे. या समितीत अमेरिका, इंग्लंड, कॅनडामधील तज्ज्ञांचा समावेश आहे. यात रसायनशास्त्रज्ञ जोस लुईस जिमेनेज यांचाही समावेश आहे. ते कॉऑपरेटिव्ह इंस्टिट्यूट फॉर रिसर्च इन इनव्हारनमेंटल सायन्स आणि कॉलोरांडो विद्यापीठात कार्यरत आहेत.

असा निष्कर्ष काढला

एका व्यक्तीकडून ५३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात केलेल्या निरीक्षणात प्रत्येक व्यक्ती एकाच पृष्ठभागावर हात लावण्यास गेली नव्हती आणि एकमेकांच्या संपर्कातही आली नव्हता. तरीही त्या लोकांना कोरोनाची लागण झाली. याचा अर्थ कोरोना हवेतून पसरतो असा निष्कर्ष मांडण्यात आला.कोरोनाचा प्रसार बंदीस्त जागेपेक्षा बाहेर सर्वाधिक वेगाने पसरत असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. कोरोनावर रिसर्च करण्याऱ्या तज्ज्ञांनी या अहवालात स्कॅगिट चॉयर आउटब्रेकची संज्ञा मांडली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0
संग्रहित छायाचित्र

राज्यात तीन लाख किलो डाळ सडली… शासनाच्या गोदामांचे सत्य उघड

CSK vs PBKS : वानखडेत चेन्नई ‘किंग्ज’; पंजाबवर 6 गडी राखून विजय