in ,

खळबळजनक: बदलापूर मध्ये एकाचवेळी ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Share

ठाणे: शहरातील बदलापूर मध्ये तब्बल ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपूर्वी येथे ३ रुग्ण आढळले होते. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तिन्ही रुग्णांना उल्हासनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. बदलापुरात अचानक आठ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. कात्रप परिसरात चार तर अयोध्या नगर मध्ये चार मुले तर चार मोठ्या व्यक्तीना कोरोना असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच हे रुग्ण पूर्वी आढळलेल्या रुग्णांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे.  

काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व २० वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली होती. लॉकडाउन काळातही साताऱ्यात नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेले असताना, कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर बदलापूरात आल्यानंतर सोसायटीत वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या संपर्कात पोलिस कर्मचाऱ्याची पत्नी व मुलगी आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या नातेवाईकांचीही चाचणी केल्यानंतर चार जणांचा अहवाल पॉजिटीव्ह आल्याचं कळतंय.

दरम्यान, दुसऱ्या प्रकरणात वोकहार्ट रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली होती. प्रशासनाला ही बाब समजताच त्याला क्वारंटाइन करण्यात आलं. मात्र बदलापूरमध्ये हा रुग्ण आपल्या बहिणीच्या घरात गेलेला होता, त्यामुळे बहिणीच्या घरातल्यांचीही चाचणी करण्यात आली, ज्याच्यात आणखी ४ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.

नवीन रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यात महत्वाची गोष्ट म्हणजे, नव्याने बाधित करोना रुग्ण हे बदलापूरमधील एका डॉक्टर आणि भाजीवाल्याच्या संपर्कात आले होते, मात्र या दोघांचेही अहवाल निगेटीव्ह आल्याचं समजतंय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘सलमान खानने पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना फटकारलं, आणि पुढे म्हणाला…’

कोरोना व्हायरसचा असाही एक फटका, थंड पाणी पाजणाराच्याच घश्याला कोरडं! वाचा…