in

कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 10 लाखांचा टप्पा,चिंता वाढली…!

Share

देशभरातील कोरोना रूग्णांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातल्या महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत कोरोनाचे अधिक रूग्ण आढळून येत आहेत.

आज घडीला देशात 10 लाख 500 पेक्षा अधिक कोरोना रूग्ण आहेत. त्यापैकी 6 लाख 36 हजार जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे तर 3 लाख 42 हजार जण सध्या अ‌ॅक्टीव्ह आहेत. (उपचार घेत आहेत)

देशभरात प्रत्येक दिवशी साधारणतः 30 हजार नवे रुग्ण रोज पॉझिटिव्ह आढळत आहेत. अशा परिस्थितीतही देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण रिकव्हरी रेट हा 63.25 टक्के इतका झाला आहे.

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.25 टक्के इतकाआहे. बहुतांश रुग्णांमध्ये किरकोळ लक्षणं आहेत. 0.32 टक्के रुग्ण असे आहेत ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे. तर ऑक्सिजन द्यावा लागणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे 3 टक्क्यांपेक्षाही कमी आहे”

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नांदेडात पहिल्याच पावसात घरात शिरलं पाणी; महापालिकेच्या नाले सफाईवर प्रश्नचिन्ह

रेल्वे प्रवाशांना दिलासा;चर्चगेट ते डहाणू थेट लोकल सुरु