in ,

Corona Positive | मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण; राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीवट करत माहिती दिली. दरम्यान रविवारी कोल्हापूर येथील माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि वैष्णवी यांचा विवाहसोहळ्यात छगन भुजबळ यांची ही उपस्थिती होती.

”माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.” असं छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा पार पडून आणखी 24 तासही उलटत नाहीयत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा

नव्या कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींचा एल्गार, आज वायनाड येथे ट्रॅक्टर रॅली