in ,

राज्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला ७० हजारांचा टप्पा; 2361 नवे रुग्ण, 76 मृत्यू

Share

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचे 2361 रुग्ण आढळले आहेत. तर 76 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 70 हजार 13 इतकी झाली आहे. 24 तासात 779 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 30 हजार 108 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 37 हजार 534 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

ज्या 76 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे त्यापैकी 45 रुग्ण पुरुष तर 31 महिला होत्या. 76 पैकी 37 रुग्णांचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होते. तर 36 रुग्णांचे वय हे 40 ते 59 इतके होते. तीन रुग्णांचे 40 वर्षांपेक्षा कमी होते. आज ज्या 76 रुग्णांचा मृत्यू झाला त्यापैकी 51 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार हे गंभीर स्वरुपाचे आजार होते. आज नोंदवण्यात आलेल्या 76 मृत्यूंपैकी 54 मृत्यू गेल्या दोन दिवसांमधले आहेत.

इतर 22 मृत्यूंपैकी 9 मुंबईत, 5 नवी मुंबईत, 3 औरंगाबाद, 2 रायगड, 1 बीडमध्ये, 1 मीरा भाईंदर तर 1 ठाण्यात झाला आहे. 4 लाख 71 हजार 573 रुग्णांच्या चाचण्यांपैकी 70 हजार 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. इतरांचे निगेटिव्ह आले आहेत.

सध्याच्या घडीला 5 लाख 67 हजार 552 होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 36 हजार 189 लोकांना संस्थात्माक क्वारंटाइन करण्यात आलं आहे. दरम्यान 72 हजार 704 बेड्सही संस्थात्मक क्वारंटाइनसाठी उपलब्ध आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Today is the last day for the servants to reach Konkan

COVID-19 | एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला मिळणार 50 लाखांची मदत

india doctor

आरोग्य व्यवस्थेने माझ्या वडीलांचा बळी घेतला; मी फक्त पाहात होतो…