in ,

मुंबईमध्ये कोरोना संख्येत पुन्हा वाढ

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आलेली असताना आता पुन्हा एकदा मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. दक्षिण मुंबईमधील उच्चभ्रू भागात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली असून एका कुटुंबातील अनेक सदस्य करोनाबाधित होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याची माहिती महानगरपालिकेने उच्च न्यायालयात दिली होती. शहरातील ४२ लाख सामान्य नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर ८२ लाख नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे.

तर 3942 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. सध्याचा केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात सुरु असल्याने लसीकरण मोहीम पूर्ण वेगात सुरु आहे. त्यामुळे एकंदर परिस्थिती पाहता मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नाही, असे पालिकेने न्यायालयात सांगितले होते. नागपूर,औरंगाबादमध्ये एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 7,नाशिक 17,पुणे 14,कोल्हापूर 3,लातूर 5, मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,39,587 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,328 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मैत्रिणीने नकार दिला म्हणून तरुण आत्महत्या करण्यासाठी टेरेसवर चढला

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे गाव गेल्या 40 वर्षां बनले हत्ती रोगाचे केंद्र