in

शिवसेनेच्या ‘या’ नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी

Share

महाविकास आघाडी सरकार राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असताना देखील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. त्यात आता एका शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे.

मिरा- भाईंदर महापालिकेत ते शिवसेनेचे गटनेते म्हणून कार्यरत होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचार दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान नगरसेवकासह त्यांची आई, बायको आणि भाऊ यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज दिला होता. तर अद्याप भाऊ आणि आई हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

संबंधित नगरसेवक हे आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू मधले एक होते. तसेच ते मिरा भाईंदर महानगरपालिकेत दोन वेळा निवडून आले होते. या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले होते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘या’ सापाची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Happy Birthday Johnny Depp: जॉनी अवघ्या १२व्या वर्षी होता दारू आणि ड्रग्जच्या आहारी…