in ,

सहाय्यक पोलीस उपायुक्त अधिकाऱ्याच्या पुढाकाराने गाव झाले कोरोनामुक्त

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे कामकाज शर्थीचे चालू असताना नाशिक जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपायुक्त अधिकारी असलेले अमोल तांबे हे मुळ शिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथील रहिवासी आहेत. कोरोना महामारीमुळे त्यांनी स्व खर्चातून गणेगाव खालसा येथील गावात कोविड सेंटर सुरू करण्यात आले.या कोविड सेंटरची सुरुवात केल्यानंतर गावातील सर्वच नागरिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला.

गणेगाव येथील नागरिकांना कोणतेही लक्षण दिसले की गावातच असलेल्या कोविड सेंटरमध्ये चाचणी करण्याची सुविधा असल्याने लगेच त्याठिकाणी चाचणी करून कोविड सेंटरला उपचार करण्यात येत आहे.याचा परिणाम आज रोजी असा झालं की गणेगाव खालसा येथे एक ही रुग्ण नसून गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले असून सेंटर सुरू झाल्यापासून एक ही मृत्यू झालेला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या बनावट गोळ्या बनवून विकणाऱ्या आरोपीस अटक

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथिल करावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी