in ,

ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, मृत महिलेचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह

Share

वर्धा: ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आठ मे रोजी मृत्यू झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही मृत महिला आर्वी तालुक्यातील हिवरा गावातील असून तीची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली.

तसेच दोन दिवसांपूर्वी वाशीम जिल्ह्यातील ६४ वर्षीय इसमाला सावंगी रुग्णालयात न्यूमोनियाचा त्रास असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णाचा सुद्धा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. या रुग्णास आता सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची प्रशासनाची माहिती आहे.

दरम्यान, पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बैठक घेत कंटेन्मेंट झोन निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. एवढंच नव्हे तर मृत महिलेच्या संपर्कात आलेल्याची माहिती घेत त्यांचे नमुने घेणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

सांगोल्यात बेकायदेशीर प्रवेश करणारे १२७ मुंबईकर पोलिसांच्या ताब्यात

कोरोनाचा कहर! राज्यात आज २ हजार ३४७ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्णसंख्या ३३ हजार ५३ वर