in ,

शिवसेना भवनात कोरोनाचा शिरकाव…

Share

शिवसेना भवनात कोरोना विषाणूने प्रवेश केल्याचे वृत्त हाती येत आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कारणाने आता काही दिवसांसाठी शिवसेना भवन बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोना विरोधात लढा देण्यासाठी गेल्या जवळपास दोन महिन्यापासून शिवसैनिक मदतकार्य करत होते. यासाठी प्रत्येकजण शिवसेना भवनात एकत्र जमायचे. हे मदतकार्य करत असताना कार्यकर्ते अनेकांच्या संपर्कात येत होते. त्यामुळेच एका शिवसैनिकाला करोनाची लागण झाली असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोमवारपासून निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येत आहे.तसेच शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पुलवामा चकमक; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान तर बार्शीचा एक जवान शहीद

कांद्याच्या चकत्या घराच्या कोपऱ्यात ठेवल्यास होईल ‘हा’ फायदा