in

विधानभवनात कोरोना

Share

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने प्रत्येक नेते, मंत्र्यांची कोरोना टेस्ट करूनच त्यांना आता प्रवेश दिला जात आहे. मात्र यात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.चक्क एक कोरोना पॉझिटिव्ह कक्ष अधिकारीच विधानभवनात मुक्त संचार करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन दिवसीय अधिवेशनात ज्यांचा अहवाल निगेटीव्ह आलाय त्यांच्या पासवर फुली मारुन त्यांना प्रवेश दिला जातोय. यावेळी या कक्ष अधिकाऱ्याचीही चाचणी झाली असता अहवाल आला नसल्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्या अधिकाऱ्याने स्वत: च त्याच्या प्रवेश पासावर मार्करने फुली मारून विधानभवनात प्रवेश केला. दरम्यान, दुपारी ३ वाजता आलेल्या अहवालात तो पॉझिटिव्ह आढळला.

दरम्यान आत प्रवेश केलेल्या कक्ष अधिकाऱ्याने प्रधान सचिवांची भेट घेतली, अधिकाऱ्यांच्या गॅलरीत बसला, मंत्र्यांच्या दालनात फिरला असल्याची माहिती आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याविरोधात चौकशीची मागणी होत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

विधानपरिषद उपसभापतीपद निवडणूक; भाजप – शिवसेनेत थेट सामना

Women Tractor driver Jyoti Deshmukh;महिलांमध्ये नवीन उमेदीच्या बीज रोवणाऱ्या ‘ज्योती’