in , ,

कोरोनाचे आज १६०६ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण ३० हजार ७०६

Share

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज  १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

राज्यात ६७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. त्यापैकी २२ मृत्यू हे गेल्या २४ तासातील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४१,  पुण्यात ७, ठाणे शहरात ७, औरंगाबाद शहरात ५, जळगावमध्ये  ३, मीरा भाईंदरमध्ये २, नाशिक शहरात १ तर  सोलापूर शहरामध्ये  १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४७ पुरुष तर २० महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३८ रुग्ण आहेत तर २५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६७ रुग्णांपैकी ४४ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ६१ हजार ७८३ नमुन्यांपैकी २ लाख ३१ हजार ०७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३० हजार ७०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३ लाख ३४ हजार ५५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७ हजार ४८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Exclusive |लॉकडाऊनमध्ये शूट होणारी पहिली मालिका, लीना भागवत-मंगेश कदम विशेष मुलाखत

Prakash Ambedkar will agitate with 1 lakh Warakaris to open a temple of Vitthal

ग्रामीण अर्थव्यवस्थेता चालनासाठी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करावा – प्रकाश आंबेडकर