in ,

कोरोनाचा स्फोट; राज्यात आज 24 हजार 645 नवीन रुग्ण

राज्यात नवीन कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यसरकारसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. आज राज्यात 24 हजार 645 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.दरम्यान जर अशीच रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाउन सुरू करावं लागेल, असा सूचक इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे.

राज्यात आज एकूण 2 लाख 15 हजार 241ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.गेल्या 24 तासांत राज्यात 24 हजार 645 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आज 58 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यू दर 2.13 टक्के एवढा आहे.

तसेच आज 19 हजार 463 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 22 लाख 34 हजार 330 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 89.22 टक्के एवढे झाले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत रूग्ण संख्या अशीच वाढत राहिली लॉकडाउन सुरू करावं लागेल, असा सूचक इशारा दिला आहे.सध्या दररोज तीन लाख लोकांचं लसीकरण केलं जात आहे, तीन महिन्यात लसीकरण कार्यक्रम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही टोपे म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”तेरे को भी जेल में डालेंगे”, नवनीत राणा यांचा अरविंद सावंतानी धमकावल्याचा आरोप

वाझे यांच्या भिवंडीच्या गोडाऊनमध्ये ‘एटीएस’… झाडाझडतीला सुरुवात