in ,

यवतमाळमध्ये कोरोनाने अर्धशतक पार; आज १६ नवे रुग्ण आढळले

Share

यवतमाळ: राज्यात कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत आहे. यवतमाळ मधील मेडिकल कॉलेजमधील आयशोलेसन वॉर्डातील १६ रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० वर पोहोचलीय. विशेष म्हणजे शनिवारी २० रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

सध्या २६४ जणाच्या स्वॅबचे नमुने तपासणीकरिता नागपुरला पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या रिपोर्ट ची प्रतीक्षा आहे. दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८ हजार ६८ वर पोहचली आहे. प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली असून राज्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे ४४० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोना व्हायरस: राज्यात दिवसभरात १९ जणांचा मृत्यू, एकूण रुग्णांची संख्या ८ हजार ६८ वर

उद्या पंतप्रधानांसह व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये देशातील ‘ही’ ९ राज्ये बोलण्याची शक्यता