in

Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४८ रुग्णांची नोंद

देशात गेल्या काही दिवसांपासून सतत ४० हजारांपेक्षा रुग्ण आढळत होते. पण दिलासादायक म्हणजे देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ९४८ रुग्ण आढळले असून २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४३ हजार ९०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारच्या तुलनेत आज सापडलेली रुग्णसंख्या ८.९ टक्क्यांनी कमी आहे.

रविवारी देशात ४२ हजार ७६६ करोनाबाधित आढळले होते. सध्या देशाचा रिकव्हरी रेट ९७.४४ टक्क्यांवर आहे.
देशात सध्या ४ लाख ४ हजार ८७४ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. नव्या बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३० लाख २७ हजार ६२१वर पोहोचले आहेत. त्यापैकी ३ कोटी २१ लाख ८१ हजार ९९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत ४ लाख ४० हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Belgaum Municipal Election Results 2021 | बेळगाव महापालिकेत भाजपा आघाडीवर तर महाराष्ट्र एकीकरण समिती 4 जागांवर विजयी

कायद्याने देशमुखांनी चौकशीला सामोरे जावे- देवेंद्र फडणवीस