in

Corona Update: देशात गेल्या २४ तासांत ३० हजार बाधितांची नोंद

देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ५७० कोरोनाबाधित आढळले असून ४३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच ३८ हजार ३०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन बाधितांसह देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३३ लाख ४७ हजार ३२५ झाली असून आतापर्यंत ३ कोटी २५ लाख ६० हजार ४७४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ९७.६४ टक्क्यांवर आहे.

देशात सध्या ३ लाख ४२ हजार ९२३ सक्रीय रुग्ण उपचाराधीन आहेत, तर कोरोनामुळे आतार्यंत ४ लाख ४३ हजार ९२८ जणांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, देशाचा विकली पॉझिटिव्हीटी रेट सध्या १.९३ टक्के असून हा रेट गेल्या ८३ दिवसांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे, तर डेली पॉझिटीव्हीटी रेट १.९४ टक्क्यांवर असून गेल्या १७ दिवसांपासून हा दर ३ टक्क्यांपेक्षा खाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह यांना दिलासा नाहीच; याचिका फेटाळली

Gold Price Today : सोने झाले स्वस्त