in

कोरोनामुळे जीडीपी घसरला, ७.३ टक्क्यांची घसरण

कोरोनाचा प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला दिसून येत आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील जीडीपी आकडेवारी जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार जीडीपीत ७.३ टक्क्यांची घट दिसून आली आहे. चार दशकातील सर्वात मोठी घट असल्याची नोंद झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही घट ४ टक्के होती.

आर्थिक वर्ष २०१९-२० या कालावधीत जीडीपी ४ टक्के होता. केंद्र सरकारने या आर्थिक वर्षात ८ टक्के जीडीपी घसरेल असा अंदाज बांधला होता. मात्र २०२०-२१ या वर्षात जीडीपी ७.३ टक्क्यांनी घट नोंदवली गेली. चौथ्या तिमाहीत ग्रोथ रेट १.६ टक्के नोंदवला गेला. मागच्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची पहिली लाट आली होती. तेव्हा अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं होतं.

भारतात ही परिस्थिती असताना दुसरीकडे, चीनमध्ये जानेवारी-मार्च २०२१ या तिमाहीत १८.३ टक्क्यांनी जीडीपी वाढला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

New IT Rules | Facebook आणि Google सारख्या वेबसाईटने अपडेट करण्यास सुरुवात

ममता बनर्जी आणि केंद्र पुन्हा आमने-सामने