in ,

मुंबईत कोरोना रुग्णांचा स्फोट , २४ तासांत ५ हजार १८५ नव्या रुग्णांची वाढ

राज्यात कोरोना विषाणू एकदा डोकेवर करून पाहत आहेत. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात मुंबईत तब्बल ५ हजार १८५ नवे करोनाबाधित सापडले आहेत.
महानगरपालिकेने त्यांच्या ट्विट करता याबद्दल माहिती दिली आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या करोनाबाधितांचा आकडा कसा नियंत्रणात आणता येईल, याविषयी पालिका प्रशासन विचार करत आहे. त्यामध्ये मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू होऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र, असं असलं तरी वाढते करोनाबाधित ही मुंबईकरांची चिंता वाढवणारी बाब ठरली आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर महापालिकेने होळी व धूलिवंदन साजरे करण्यास मनाई करणारा आदेश काढला असताना मुंबईत कोविड नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. अशी माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली.

जुहू चौपाटी व मुंबईतील अन्य चौपाट्या तसेच विविध पर्यटनस्थळांवर गर्दी होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. सोमवारपासून जुहू चौपाटीवर अँटिजेन टेस्टही सुरू करण्यात आली आहे. तसंच परिस्थिती गंभीर झाल्यास पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे, शिवाय पर्यटकांनी नियमांचे पालन करावे, अशीही सूचना देण्यात येत आहे, असे काकाणी यांनी नमूद केले.

पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात ५ हजार १८५ नवे करोनाबाधित सापडले असून मुंबईतल्या एकूण बाधितांची संख्या आता ३ लाख ७४ हजार ६११ इतकी झाली आहे. त्यापैकी ३० हजार ७६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईत आहेत. करोनाचं संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने ३ हजारांच्या वर रुग्ण सापडत असताना आज अचानक ही रुग्णवाढ ५ हजारांच्या वर गेली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पालिका म्हणते, मुंबईत लॉकडाऊन नाही, पण…

निकिता तोमर हत्या प्रकरण : तौसिफ आणि रेहानला ठरवलं हरियाणा कोर्टाने दोषी