in

वैद्यकीय प्रवेशांबद्द्ल विद्यार्थ्यांना दिलासा

Share

राज्यातील मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यानंतर आज अमित देशमुख यांनी विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात 70:30 ही कोटा पद्धत रद्द करत असल्याची घोषणा केली.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असं वर्गीकरण करण्यात येत होतं. या वर्गीकरनानुसार ज्या भागामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असेल तेथील स्थानिक विद्यार्थ्यांना 70 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. बाकी राहिलेल्या 30 टक्के जागांवर राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत होता. मात्र मराठवाडा विदर्भामध्ये वैद्यकीय महाविद्यालय कमी होती आणि प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

या महिला जिल्हाधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह