in ,

एकनाथ खडसे यांना 17 फेब्रुवारीपर्यंत दिलासा

लोकशाही न्यूज नेटवर्क

भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी केल्याच्या आरोपावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावले आहेत.

समन्स बजावल्यानंतर खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजरही झाले होते. ईडीनं ऑक्टोबर महिन्यात खडसेंविरोधात ईसीआयआर दाखल केल्याने खडसेंनी याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा देण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर गुरूवारी न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीवर 17 फेब्रुवारीपर्यंत एकनाथ खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे. गुरूवारी ईडीच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं कीकठोर कारवाई न करण्याचं ईडीकडून हायकोर्टात दिलेलं आश्वासन पुढील सुनावणीपर्यंत कायम राहील असं. असे ईडीने सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

उपेंद्र लिमये आता गायक, संगीतकाराच्या भूमिकेत