in

सचिन ‘भारतरत्न’साठी लायक नाही, काँग्रेस खासदार भडकले

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून सेलिब्रिटींमध्ये ट्विटर वॉर सुरू आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरने उडी घेतल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर आता काँग्रेसचे खासदार जसबीर एस. गील यांनी मास्टरब्लास्टवर निशाणा साधला आहे. भारतरत्न होण्यास लायक नसल्याची टीका या खासदाराने केली आहे. तसेच अन्य काही सेलिब्रिटींवरही जसबीर एल. गील यांनी टीका केली आहे.

जो अभिनेता अक्षयकुमार पंतप्रधानांना तुम्ही आंबे खाता का? असं विचरतो. त्याच्या बौद्धिक पातळीवर मी काय म्हणणार? या व्यक्तीचं म्हणणं कोणीही गांभीर्यानं घेत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांविरोधात ट्वीट करून सरकारची स्वत:ची भीती समोर आली आहे, असे खासदार म्हणाले.

“शेतकऱ्यांच्या विरोधात ज्यांनी विधानं केली त्यांची सद्विवेकबुद्धी गमावली आहे. त्यांचा आत्मसन्मान संपलेला आहे. सचिन तेंडुलकरने केवळ आपल्या मुलाला आयपीएलमध्ये जागा मिळावी, यासाठी सरकारने सांगितलेलं ट्वीट केलं. मी जनतेवर हे सोडून देतो की त्यांनी निर्णय घ्यावा की, हा माणूस भारतरत्नच्या लायकीचा आहे की नाही. मला तर सचिन तेंडुलकर भारतरत्नच्या लायकीचा वाटतं नाही”, अशा शद्बांत सचिन तेंडुलकरवर काँग्रेसच्या खासदाराने टीका केली आहे.

काँग्रेसच्या काळात सचिनला भारतरत्न

दरम्यान, 2013 साली मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न हा देशातील सर्वोच्च सन्मान मिळाला होता. यावेळी केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. भारतरत्न तसेच अन्य पद्म पुरस्कारांसाठी केंद्र सरकारच्या अखत्यारित समिती गठीत केली जाते. या समितीच्या शिफारसीनुसार काही नावं पुढे येतात. या मान्यवरांना पुरस्कार प्रदान केले जातात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देव तारी त्याला कोण मारी…

उत्तराखंड हिमस्खलन : मृतांना प्रत्येकी चार लाखांची मदत, बचावकार्य सुरू