अँटिलिया स्फोटक, सचिन वाझे अटक आणि परमबीर सिंह-अनिल देशमुख या तिन्ही प्रकरणांमध्ये सर्वात कोंडी झाली आहे ती काँग्रेसची. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज (23 मार्च) बैठक झाली. आम्ही एकत्र बसून चर्चा केली, एवढेच काँग्रेस नेत्यांनी या बैठकीनंतर सांगितले. त्यामुळे यासंदर्भातील त्यांची पुढील भूमिका नेमकी काय असेल, हे स्पष्ट झालेले नाही.
या तिन्ही प्रकरणांत भाजपा खूपच आक्रमक झाली आहे. त्यांच्या निशाण्यावर मुख्यत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. यासर्व प्रकरणांत काँग्रेसकडून प्रत्युत्तर दिले जात असले तरी, अद्याप या वादात काँग्रेस प्रत्यक्ष उतरलेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आणि इतर नेते एकत्र बसलो होतो. आमची भूमिका होती, ती मांडलेली आहे. सध्याच्या स्थितीत बद्दल आम्ही चर्चा केली, असे बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर सांगितले.
Comments
Loading…