in

MPSC Exam Postponed : परीक्षा निर्धारित वेळेतच घेण्याची काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र त्यावरून पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर व अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संयमाचा उद्रेक झाला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या परीक्षा ठरलेल्या दिवशीच घेण्याची मागणी केली आहे.

एमपीएससी परीक्षा येत्या रविवारी होणार होती. मात्र ऐनवेळी ती पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये एमपीएससी परीक्षा होणार होती. परंतु कोरोनाच्या उद्रेकामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. नंतर ऑक्टोबर महिन्यात ही परीक्षा घेण्याचे ठरवले असले तरी, ती पुन्हा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर 14 मार्च ही तारीख जाहीर करण्यात आली. त्याला आता दोन दिवस राहिलेले असतानाच, ती तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली. अनेक संकटांना मात करत विद्यार्थी या परीक्षेसाठी परिश्रम घेत असतो. विद्यार्थांचे भविष्य हे या परीक्षेवर अवलंबून असते. त्यामुळे कोरोनाविषयीच्या संपूर्ण नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता परीक्षा झाली पाहिजे ही आमची मागणी असल्याचे पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे फोनवरून बोलणे झाले असून मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, असे पटोले म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC Exam Postponed;’नाईट क्लब चालतात, मग परीक्षा का नाही ?’; नेत्यांचा ‘मनसे’ सवाल

MPSC Exam Postponed : ‘विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण करू नका, निर्णय रद्द करा’