in

Deglur Assembly by Election Result | भाजपला झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा विजय

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे.

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना 1 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसनं ही पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती.

उमेदवार निहाय मतं

  • जितेश अंतापूरकर – 1 लाख 8 हजार 789
  • सुभाष साबणे – 66 हजार 872
  • उत्तम इंगोले – 11 हजार 347
  • विवेक सोनकांबळे – 465

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज कुंद्राने सोशल मीडिया , ठोकला राम राम!

Mission Majnu ची रिलीज डेट समोर आली