in

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक

लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रातील भाजप सरकारमुळे वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल व डिझेल दरवाढ तसेच घरगुती गॅस दरवाढ लादली जात आहे. या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईतील सर्व 227 वॉर्डांमध्ये काँग्रेसच्यावतीने पदयात्रा काढण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसच्यावतीने माझी मुंबई -माझी काँग्रेस – 100 दिवस 100 वॉर्ड उपक्रमाअंतर्गत प्रतीक्षा नगर, शीव कोळीवाडा आणि अँटाँप हिल भागात आज पहिली पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेचा शुभारंभ काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या पदयात्रेचे नेतृत्व मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी केलं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन मुंबई दौऱ्यावर

पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीवर रोहित पवारांची सरकारवर टीका