in

मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास, डेलकर कुटुंबीय

काही दिवसांनपूर्वी दीव दमणचे अपक्ष खासदार मोहन डेलकर हे मुंबईतील मरिन ड्राईव्ह मधील हॉटेलमध्ये मृतदेह आढळला होता. त्यांच्या या संशयास्पद मृत्युचे पडसाद विधानसभेत देखील पडत आहेत. या विषयामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर डेलकर यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांची भेट घेतली.

यावेळी आपला महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, तपास यंत्रणा योग्य तो तापस करतील,असे मत डेलकर यांच्या मुलाने मांडले तर मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास असून आम्हाला न्याय मिळाले अशी अशा आहे , असे मत डेलकर यांच्या पत्नींनी माध्यमांसमोर व्यक्त केले.

दादरा हवेलीचे खासदार आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकाने या प्रकरणामध्ये लक्ष घालावे अशी इच्छा डेलकरांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी डेलकरांचे कुटुंबीय गृहमंत्री अनिल देशमुखांची सुद्धा भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येत आहे.

खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या दबावातून झाल्याचे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यामुळे या प्रकरणातील धागे दोरे समोर येणार आहेत.

दीव दमणच्या खासदाराच्या आत्महत्येचे प्रकरण :
काही दिवसांनपूर्वी दीव दमणचे अपक्ष खासदार मोहन डेलकर हे मुंबईतील मारिन ड्राईव्ह हॉटेल मध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. त्यांच्या मृतदेहाजवळ गुजरातीमध्ये लिहलेली एक चिट्ठी सुद्धा सापडली होती. पोलिसांकडून आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मृतदेहाच्या जवळ सापडलेल्या चिट्ठीमध्ये काही बड्या नेत्याची नावे असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. १९८९ मध्ये मोहन डेलकर हे खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते. भारतीय नव शक्ती पार्टीचे ते खासदार राहिले होते. २००९ त्यांनी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा राजीनामा

पृथ्वीची ‘शॉ’नदार खेळी; मुंबईचा उपांत्य फेरीत प्रवेश