in ,

वसईत ‘या’ भागात 14 दिवसांचा कडकडीत बंद

Share

संदीप गायकवाड | वसई-विरार शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, महापालिकेने आजपासून 14 दिवसांचा कडकडीत बंद लागू करण्याचा निर्णय घेतला.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितलं. त्यामुळे महापालिकेच्या या बंदमुळे तरी वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून नायगाव कोळीवाड्यात 22 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातच या आठवड्याच्या सोमवारी याचा परिसरात एका कोरोना रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. विशेष हा परिसर अत्यंत दाटिवाटीचा आहे.इतक्या घटना घडूनसुद्धा नागरिकांकडून सामाजिक अंतराचे उल्लंघन केले जात होते. त्यामुळेच नायगाव कोळीवाडा परिसरातील बेसिन कॅथलिक बँक ते नायगाव स्टेशन परिसराकडील कोळीवाड्याची हद्द महापालिकेने पूर्णपणे सील करण्याचा निर्णय घेतला.या बंदमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सवलत असणार आहे.

वसई विरार मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 2348 पर्यंत पोहोचला आहे. यामद्ये मंगळवारी 39 कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. तर उपचारा दरम्यान 4 रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यामुळे शहरात एकूण मृत्यूची संख्या 93 वर पोहोचली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे काल 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1370 वर आहे. तर उपचार घेत असलेले रुग्णांची संख्या 885 आहे.

प्रवीण दरेकर वसई दौऱ्यावर

वसई-विरार महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. या परिसरातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनासंदर्भातली पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आज वसई विरार दौऱ्यावर येणार आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर हे आयुक्तांची भेट घेऊन या सर्व परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Video; संतापजनक… कर्जासाठी शेतकरी महिलेला केलं विवस्त्र

अबब…35 किलोचा जिताडा मासा लागला जाळ्यात