in

परमबीर सिंह यांच्या आरोपांची आयोगामार्फत होणार चौकशी?

आधी सचिन वाझे प्रकरण आणि नंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरब़ॉम्बमुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. या सर्व घडामोडींमुळे सरकार अस्थिर होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने आज रात्री उशिरा वर्षावर झालेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या बैठकीत महत्त्वाची बैठक झाली.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत ही चौकशी करण्यात येणार असून याबाबत लवकरच चौकशी आयोग नेमण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

याशिवाय, या बैठकीत रश्मी शुक्ला यांनी परवानगी नसताना फोन टॅप केले याबाबत चर्चा करण्यात आली. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मंत्र्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतला असून फोन टॅपिग प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सारथी संस्थेला पुण्यात शिवाजीनगरमध्ये मिळणार जागा, मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

परमबीर सिंग यांची मुंबई हायकोर्टात याचिका