in

दिलासादायक ; शास्त्रज्ञांनी तयार केले कोरोनाचे औषध

Share

दिवसेंदिवस जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता कोरोनाची लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगाचं लक्षं आहे. कोरोना रुग्णांचे उपचार करण्यासाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन (UPMC) च्या शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूच्या उपाचारांबाबत मोठं यश मिळालं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याद्वारे सग्ळ्यात लहान बायोलॉजिकल मॉलेक्यूल्सना वेगळं करण्यात आलं आहे. याद्वारे कोरोना व्हायरसला न्यूट्रलाईज करता येऊ शकतं.

नवीन एका मॉलेक्यूलच्या साहाय्यानं शास्त्रज्ञांनी Ab8 हे औषध तयार केलं आहे. प्रत्यक्षात हा एंटीबॉडीचाच एक भाग आहे. सामान्य आकाराच्या एंटीबॉडीजपेक्षा १० पटीनं लहान आहे. उंदरांवर सगळ्यात आधी या औषधांचं परिक्षण करण्यात आलं होतं. हे औषध दिल्यानंतर कोरोनामुळे संक्रमित होण्याचा धोका १० टक्क्यांनी कमी झालेली दिसून आला. हे मॉलेक्यूल्स मानवी पेशींच्या संपर्कात येत नाहीत. त्यामुळे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका नसतो. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांच्या उपाचारांसाठी Ab8 हे औषध महत्वपूर्ण ठरू शकतं.

युनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्गमधील संक्रामक रोग विभाग प्रमख आणि साहाय्यक लेखक जॉन मेलर्स यांनी सांगितले की, Ab8 कोरोना रुग्णांच्या उपचारात एका थेरेपीप्रमाणे काम करेल. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून बचावासाठी परिणामकारक ठरू शकते. या औषधाची लवकरात लवकर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या औषधाचे मुल्यांकन युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी केलं आहे. आतापर्यंतच्या चाचणीत हे औषध व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचे दिसून आलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

IPL 2020 लाईव्ह पाहण्यासाठी JIO चा नवा ‘प्लॅन’

सर्वसामान्यांना दिलासा ; सिटीस्कॅन चाचणीचे दर निश्चित होणार !