in

दिलासादायक ! कोरोना रुग्णांच्या मृत्यूत घट

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या अनेक महिन्यांपासून जगासह देशावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. कोरोनामुळे देशभरात अनेकांचा प्राण देखील गेला आहे. मात्र आता गेल्या 10 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूत 150 हून कमी संख्येने नोंद नोंदवत भारताने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. तर गेल्या 24 तासांत केवळ 84 मृत्यूची नोंद झाली.

आता कोरोना वॅक्सीन लॉन्च करण्यात आली असल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाली असून, शनिवारी ही संख्या ११७१३ होती.

या संसर्गातून १ कोटी ५ लाखांहून अधिक लोक बरे झाले असून उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण आणखी कमी म्हणजे १.३७ टक्के झाले आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ०८ लाख १४ हजार ३०४ असून त्यापैकी १ कोटी ०५ लाख १० हजार ७९६ जण बरे झाले आहेत. त्यांचे प्रमाण ९७.१९ टक्के आहे.

दरम्यान जगभरात १० कोटी ५९ लाख कोरोनारुग्ण असून त्यातील ७ कोटी ७५ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेत २ कोटी ७४ लाख कोरोना रुग्ण असून त्यातील १ कोटी ७१ लाख रुग्ण बरे झाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कुठे गेला मराठी बाणा? फडणवीस गृहमंत्र्यांच्या निर्णयावर आक्रमक

…म्हणून हिमकड्याचा भाग कोसळून उत्तराखंडमध्ये झाला हाहाकार!