in ,

राज्याला दिलासा; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढतेय…

Computer image of a coronavirus

महाराष्ट्रावर एकीकडे अंशत लॉकडाऊनचे संकट घोघावत असताना, दुसरीकडे कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यासाठी हि दिलासादायक बाब आहे.

राज्यात आज जवळपास 12 हजार 182 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.हा पुन्हा रुग्णवाढीनंतरचा कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा मोठा आहे. सोमवारी 9 हजार 927 कोरोना बाधीत रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे अनेक दिवसानंतर दिवसभरातील कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आढळून आली आहे.

राज्यात आज 9 हजार 927 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. तर नवीन 12 हजार 182 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 20 लाख 89 हजार 294 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 93.34 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज रोजी एकूण 95,322 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात आज 56 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद देखील झाली आहे.आजपर्यंत 52 हजार 556 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर 2.35 टक्के एवढा झालेला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन प्रकरणात माझा संबध नाही, सचिन वाझेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ट्रेलरची ट्रकला धडक