in

Maharashtra Budget | मुंबईतील कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार – अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2021-22 सादर करत आहेत.महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील 14 मेट्रोलाईनचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी 1 लाख 40 हजार कोटी खर्च अपेक्षित आहेत. तसेच मेट्रो मार्ग 2 अ, 7 चे काम 2021 पर्यंत पूर्ण करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. मुंबईतील रेल्वे रुळांवर 7 उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प 2022 ला पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच वरळी ते शिवडी पूलाचे काम 3 वर्षात पूर्ण करणार असल्यचा मानस आहे.

जलमार्गावर भर

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार असल्याचे पवार यांनी सांगितले. वसई ते कल्याण असा नवीन जलमार्ग सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभारण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Budget Session | महिलादिनी अर्थमंत्र्यांकडून बजेटमध्ये मोठी घोषणा

विधानसभेत खळबळ! विधिमंडळातील 36 कर्मचारी, नेते कोरोनाबाधित