in

नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील – उदय सामंत

रत्नागिरीमधील नाणार प्रकल्पावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक चक्र सुरळीत करण्यासाठी रत्नागिरीमधील नाणार प्रकल्प व्हावा. हा प्रकल्प हातातून गमावू नये, या अनुशांगाचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नाणार प्रकल्प नको, अशीच स्थानिकांची भूमिका आहे. शिवसेना स्थानिक जनतेसोबत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबतची शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. असं ही ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘स्त्री’ने ठरवलं तर, ‘ती’ काहीही करू शकते !

“मी कोब्रा… एक दंश झाला तरी फोटो बनाल,” – मिथुन चक्रवर्ती