in

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share

राज्यात कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढ होत चालली आहे. त्यात आज मुख्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण जगात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करत, कोरोना अजून संपलेला नसल्याचे सांगितले. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावा असे आवाहन सुद्धा नागरिकांना केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले, यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी मास्क लावणं आवश्यक, मास्क म्हणजे सेल्फ डिफेन्सचा ब्लॅक बेल्ट असल्याचे ते म्हणाले. कोरोनापासून सुरक्षित राहा, आधी मास्क लावायचा आणि कुणी भेटल्यावर मास्क काढून बोलायचं असं करू नका. गर्दीच्या ठिकाणी सदासर्वदा मास्क लावा. तसेच मास्क लावला नाही तर कारवाई होणार असे जनतेला आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी दमही भरला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE

CM Uddhav Thackeray Live | मराठा आरक्षण – काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

Posted by Lokshahi News on Sunday, September 13, 2020

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

गुहागर समुद्रकिनारी दुर्मिळ पक्ष्याचं दर्शन

मराठा आरक्षणाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?