in

CM Uddhav Thackeray Live; 3 तारखेपासून राज्यात हातपाय हालवायला सुरूवात

Share

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद सुरु झाला आहे, राज्यात लॉकडाऊन 5 लागू झाले असताना, मुख्यमंत्री काय बोलणार आहेत? कुठल्या घोषणा करणार आहेत. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे,

 1. काळजी घ्या, प्रत्येकवेळी तोंडाला हात लावू नका.
 2. आपण उघड झाप करायची नाही, जी गोष्ट सुरूवात करू, ती कायमस्वरुपी राहील.
 3. संपुर्ण महाराष्ट्रात 3 तारखेपासून हातपाय हालवायला सुरूवात करणार
 4. जिथे गर्दी जास्त असेल त्या जीमला परवाणगी नाही
 5. बाहेर पडल्यानंतर अनेक आत्पेष्ट आणि मित्र भेटतील, मात्र एकमेकांत अंतर ठेवा.
 6. 5 तारखेपासून अनेक दुकाने सुरू होणार
 7. 8 तारखेपासून कार्यालये सुरू होणार
 8. आपल्या ऑफिससेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या 10 टक्क्यांनी सुरूवात करू.
 9. काही काळ अशीच रुग्णांची संख्या वाढेल
 10. ज्यांना गरज नाही, त्यांनी घराबाहेर पडू नका, वृध्द, अनेक आजार असलेले नागरिक त्यांनी घरीच राहा
 11. घरातून बाहेर पडणाऱ्यांनीही काळजी घ्यावी, तसेच बाहेरून आल्यानंतर आपल्या घरातल्यांच्या संपर्क काही काळ टाळा.
 12. पावसाळा येत आहे, तुम्हाला काही आजारांची लक्षण आढळली, तर तात्काळ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
 13. महाराष्ट्रात आतापर्यंत 65 हजार रुग्णांना कोरोनाची लागण, तर त्यातील 28 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली.
 14. आज मुंबईत 34 हजार रुग्ण आहे, त्यातील 24 हजार हे ठणठणीत आहेत, ज्यांना कोणत्याच औषधांची गरज नाही.
 15. सरकारला विरोध करणाऱ्यांनी एकदा हे आकडे पाहावेत.
 16. आपलीच माणसं महाराष्ट्राला बदणाम करण्याचं काम करत आहेत.
 17. पुढच्या रविवारपासून घरोघरी वृत्तपत्र मिळणार
 18. वृत्तपत्र विक्रेत्यांनीही स्वत: काळजी घ्यावी, सोबत मास्क, हॅंड सॅनिटायझर ठेवावे.
 19. पहाटे 5 ते सायंकाळी 7 पर्यंत अनेक लोक व्यायामाच्या उद्देशाने मोकळ्या मैदानात जाऊ शकतात.
 20. सध्या 1200 रुग्णांची परिस्थिती चिंताजनक
 21. महाराष्ट्रात 77 चाचणी केंद्रे आहेत, येत्या काही दिवसांत 100 चाचणी केंद्रे महाराष्ट्रात उभ्या राहतील
 22. टेस्टची किंमत कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे आवाहन
 23. महाराष्ट्रात अडीच लाख बेड्सची सुविधा आहे, त्यातील 25 हजार आयसोलेशनचे बेड्स आहेत.तसेच आयसीयूचे बेड्स 8 हजारहून अधिक आहेत.
 24. महाराष्ट्राने उपचार. सुविधा आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून वारंवार काम करत आहे.
 25. मृत्यूदर आपल्याला अजूनही खाली आणायचा आहे.
 26. अंगावर दुखणं काढू नका, वेळेत डॉक्टरांशी संपर्क करा, उपचार करून घ्या
 27. मृत्यूदर कमी करण्यासाठी डॉक्टर सज्ज आहेत, पण पेशंट वेळेत येणे गरजेचे आहे.
 28. आतापर्यंत 16 लाखहून अधिक लोकांना रेल्वे आणि बसच्या माध्यमातून परराज्यात सोडलं आहे.
 29. पियुष गोयलांना धन्यवाद, त्यांच्यामुळे साडे 11 लाखाहून अधिक लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यात सोडलं
 30. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 85 कोटीहून अधिक खर्च या प्रवास योजनेवर खर्च केले आहेत
 31. आपण 32 लाख 77 हजाराहून अधिक लोकांनी आतापर्यंत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला
 32. राज्तायात तातडीने परिक्षा घेण्याची ही परिस्थिती नाही
 33. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यापेक्षा सगळ्या सेमिस्टरची सरासरी काढायची आणि त्यांचा निकाल द्यावा
 34. अनेक विद्यार्थ्यांना जर वाटत असेल की विद्यापीठाने दिलेल्या मार्कांपेक्षा जास्त मिळवू शकतात, तर त्यांच्यासाठीही सुविधा देऊ.
 35. काही देशांमध्ये सुरू केलेल्या शाळा मला परत बंद करायचं नाही
 36. मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप, टॅब अशा माध्यमातून काही शिक्षण सुरू करू शकतो का? यावर विचार सुरू आहे.
 37. जिथे गरज आहे, तिथे ऑनलाईन आणि जिथे गरज आहे तिथे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण सुरू करू
 38. फिल्ड रुग्णालये मुंबईत उभे आहेत, तशीच आणखी उभे करू
 39. इथूनपुढे आरोग्य आणि शिक्षण विभागावर लक्ष दिलं जाईल.
 40. अनेक ठिकाणी जिथे मोकळी मैदाने आहेत, जिथे मोठे कार्यक्रम होतात, तिथे आरोग्य सुविधादेखील उपलब्ध करू, जेणेकरून पुढील 2 ते 3 दिवसात तिथे रुग्णालये उभे करता येईल
 41. खबरदारी आणि जबाबदारी सोबत घेऊन पुढे जायचं आहे.
 42. जनता सोबत असताना, सरकार पडणार नाहीच
 43. मिशन बिगीन अगेनला सुरूवात
Uddhav Thackeray Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

Uddhav Thackeray Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद #Coronavirus #UddhavThackeray#PC#Live #कोरोना #मुख्यमंत्रीउद्धवठाकरे

Posted by Lokshahi News on Sunday, May 31, 2020

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुसळधार सरींना कोल्हापूर गारेगार!

SPECIAL REPORT | लॉकडाऊनच्या काळात गृहीणीने घेतलीयं अशी झेप…